'​'लाडक्या बहिणीं''नी बांधल्या अजितदादांच्या पुतळ्याला राख्या

'​'लाडक्या बहिणीं''नी बांधल्या अजितदादांच्या पुतळ्याला राख्या

 

बारामती : बारामती शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या आवारात उभारण्यात आलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णकृती पुतळ्याला रक्षाबंधनानिमित्त 'लाडक्या बहिणीं'नी राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण भावनिक वातावरणात साजरा केला. अजितदादांच्या निधनानंतर आलेले हे पहिलेच रक्षाबंधन असल्याने या वेळी अनेक बहिणींच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

      ​अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यातून सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः महिलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.राज्यातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे त्यांच्याबद्दल महिलांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली होती.त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भावाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महिलांनी त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याला राखी बांधली.

       ​यावेळी महिलांनी अजितदादांच्या पुतळ्याला औक्षण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. 'भाऊ' म्हणून अजितदादां च्या आठवणी सांगताना अनेक महिलांना भावना अनावर झाल्या. "अजितदादा आमच्यात नसले तरी भाऊ म्हणून त्यांचे प्रेम आणि आठवणी सदैव मनात राहतील," अशा भावना या वेळी महिलांनी व्यक्त केल्या.