स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अंजनगाव येथे वृक्षारोपण व  फळझाडांच्या रोपांचे वाटप

स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अंजनगाव येथे वृक्षारोपण व फळझाडांच्या रोपांचे वाटप

 

अंजनगाव (ता. बारामती) : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामती तालुक्याचे भाग्यविधाते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अंजनगाव येथे फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

 ग्रामस्थ अंजनगाव व श्रमदान ग्रुप यांच्या आयोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला  असून, स्वराज फर्निचर श्री. सुरेश शिवाजी परकाळे यांच्या विशेष सहकार्याने वृक्षवाटप करण्यात आले.

सन्माननीय उपस्थिती : डॉ. स्वप्नील चौधरी (प्रसिद्ध व्याख्याते), श्री. गणेश बिरादार सो (अतिरिक्त पोलीस अधीक्षक), श्री. हनुमंत पाटील (अतिरिक्त जिल्हाधिकारी), श्री. रमेश चोपडे (अतिरिक्त पोलीस अधीक्षक), श्री. संभाजीनाना होळकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), श्री. पुरुषोत्तम दादा जगताप (चेअरमन, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना), श्री. किरण तावरे (सभापती, पंचायत समिती), श्री. संदीप बांदल (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस).

“स्व. अजितदादांच्या स्मृती जपूया, हरित अंजनगाव घडवूया!” असा संदेश देत ग्रामस्थांनी या वृक्षवाटप उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग  घेतला .