अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला, सुनेत्रा पवार गैरहजर, अखेर काय घडले..

अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला, सुनेत्रा पवार गैरहजर, अखेर काय घडले..

 


नवी दिल्ली: खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते.

 या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. तब्बल 20 मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिसेप्शनमध्ये होते. शरद पवार यांच्यासोबत काहीवेळ गप्पा मारत नरेंद्र मोदी बसले होते. या रिसेप्शनमधील खास फोटो पुढे आलीत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुर्ण पवार कुटुंबाने फोटोही घेतला. मात्र, रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनला घरातील एका सदस्यानेच दांडी मारली, ज्यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रेवती सुळेच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर होत्या.

सुनेत्रा पवार जरी रेवतीच्या रिसेप्शनला गैरहजर होत्या तरीही पार्थ पवार आणि जय पवार यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. अजित पवारांचे दोन्ही लेक या रिसेप्शनला हजर होते. ज्यामुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या रिसेप्शनला नक्की का गैरहजर होत्या, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही.

रेवतीच्या रिसेप्शननिमित्त पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. मात्र, त्याला अपवाद ठरल्या त्या म्हणजे सुनेत्रा पवार. जवळपास पवार कुटुंबातील सदस्य या रिसेप्शनला हजर होते. अमित शाह देखील बऱ्याचवेळ येथे उपस्थित होते. शरद पवार आणि सुळे कुटुंबासोबत गप्पा मारताना अमित शाह दिसले. शरद पवार यांच्या शेजारी अमित शाह बसले होते.

विशेष म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी या रिसेप्शनमध्ये होते, त्याचवेळी अमित शाह देखील पोहोचले. अमित शाह रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले, त्यावेळी राहुल गांधी तिथेच खाली होते. दिवसभर मोठ्या राजकीय नेत्यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. सुप्रिया सुळे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना फोटोंमध्ये दिसत आहे.