भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी! महिन्याला ६३ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
भारतीय टपाल विभागाने (India Post) मेल मोटर सर्व्हिस (MMS), बेंगळुरू अंतर्गत 'स्टाफ कार ड्रायव्हर' (साधारण ग्रेड) या पदांच्या ११ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून प्रतिनियुक्ती (Deputation/Absorption) तत्त्वावर या नेमणुका केल्या जाणार आहेत.
पदांची माहिती आणि पगार (Vacancies & Salary)
या भरतीतून एकूण ११ जागा भरल्या जातील. यामध्ये बेंगळुरू येथील मेल मोटर सर्व्हिससाठी १० जागा आणि म्हैसूर सब-डेपोसाठी १ जागा निश्चित करण्यात आली आहे.
वेतनश्रेणी: निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) पे लेव्हल-२ (Pay Level-2) मध्ये १९,९०० रुपये ते ६३,२०० रुपये प्रतिमहिना मूळ पगार आणि इतर सरकारी भत्ते मिळतील.
खालील लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत माहिती पाहू शकता -
पात्रता आणि अनुभव (Eligibility Criteria)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (Class 10) पास असणे आवश्यक.
ड्रायव्हिंग लायसन्स: हलकी (LMV) आणि जड (HMV) दोन्ही प्रकारची वाहने चालवण्याचा वैध परवाना असणे अनिवार्य.
अनुभव: किमान ३ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच वाहनातील किरकोळ बिघाड दुरुस्त करण्याचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: अर्जदाराचे कमाल वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज कोण करू शकते?
ही भरती फक्त सध्या सेवेत असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) आहे. यामध्ये टपाल विभागातील डिस्पॅच रायडर आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. योग्य उमेदवार न मिळाल्यास इतर केंद्रीय सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल. तसेच एका वर्षाच्या आत निवृत्त होणारे सशस्त्र दलातील (Armed Forces) जवानही अटींनुसार अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या नमुन्यात ऑफलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वत:ची सही केलेल्या (Self-attested) प्रती जोडाव्या लागतील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बेंगळुरू - ५६०००१ (Manager, Mail Motor Service, Bengaluru - 560001).
शेवटची मुदत: 'रोजगार समाचार'मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे बंधनकारक आहे.