बारामतीत शिक्षण पद्धती,तंत्रज्ञानाच्या वापरावर मंथन
रयत गुरुकुल प्रकल्पाची कार्यशाळा उत्साहात
बारामती :- बारामती येथे झालेल्या रयत गुरुकुल प्रकल्पाच्या कार्यशाळेत आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर मंथन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत रयत गुरुकुल प्रकल्प २.० च्या विभागीय कार्यशाळेचे आयोजन बारामती येथील राधेश्याम आर. एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागात करण्यात आले होते. यात रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यातील तब्बल २८ शाळांचे मुख्याध्यापक, गुरुकुलप्रमुख,गुरुकुल सहा य्यक, गुरुकुल समन्वयक तसेच तंत्रस्नेही शिक्षक या विभागीय कार्यशाळेस उपस्थित होते.
कार्यशाळेस संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रयत शिक्षण संस्थेमध्ये होत असलेल्या विविध शैक्षणिक बदलांविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या काळाची गरज ओळखून शिक्षकांनी आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःमध्ये व अध्यापन प्रक्रियात सकारा त्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे,असे मत कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष आणि संस्थेचे संघटक अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
कर्मवीर विद्याप्रबोधिनी चे कार्यकारी संचालक कम लाकर महामुनी यांनी मुख्या ध्यापक, गुरुकुल प्रमुख व शिक्षकांना रयत गुरुकुल प्रकल्पाच्या प्रभावी अंमल बजावणीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल प्रक ल्पाची भूमिका,शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या विविध पैलूंवर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.यावेळी समन्वय समिती सदस्य सदाशिव-बापू सातव,पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते, गुरुकुल प्रकल्पप्रमुख ए.के. निकम,जनरल बॉडी सदस्य ए.बी.गायकवाड,प्राचार्य सतीश पाचपुते,गणपतराव तावरे,पर्यवेक्षिका अलका चौधर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक संजय मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन विकास जाधव व मनीषा रुपनवर यांनी केले.सतीश पाचपुते यांनी आभार मानले.