यावर्षी श्रीमंत आबा गणपती सांस्कृतिक महोत्सव रद्द
बारामती : बारामतीचे भाग्यविधाते स्व.अजित दादा पवार यांचे दुःखद निधनामुळे या वर्षी अखिल तांदूळवाडी वेस तरूण मंडळाचा श्रीमंत आबा गणपती महोत्सव तसेच श्रीमंत आबा गणपतीची निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे.
बारामतीकरांना दरवर्षी दर्जेदार सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मंडळ दरवर्षी करत असते,दादांचे व मंडळाचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते, अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ म्हणजे माझे मंडळ असे दादा सार्वजनिक रित्या बोलत असत. मंडळाच्या सुख दुःखात दादा कायम पाठीशी असायचे त्यामुळे मंडळाचा अध्यक्ष सर्वसामान्य कुटुंबातून निवडला तरी कार्यक्रमांसाठी भक्कम पाठिंबा अजितदादांच्या रूपाने मंडळाच्या पाठीशी कायम रहात आलेला आहे. यावर्षी अजितदादांच्या आकस्मिक दुःखद निधना मुळे कविवर्य मोरोपंत नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम व बारामतीकरांची आकर्षण असणारी श्रीमंत आबा गणपतीची भव्य मिरवणूक रद्द करण्यात आली आहे.
तांदुळवाडी वेस चौक येथे श्रीमंत आबा गणपती मंदिर येथे अजितदादांच्या जीवनातील व दादांच्या आपल्या सर्वांच्या जीवना तील व बारामतीसाठीच्या योगदानाबाबत माहितीपट गणेश उत्सवातील दहा दिवस सादर करण्यात येणार असून दादांना श्रद्धांजली म्हणून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण दादा नलवडे यांनी दिली.