बारामतीत ६ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

बारामतीत ६ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

 

बारामती : येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग बारामती यांच्या वतीने अवघ्या दोन महिन्यात अवैध धंद्यावर दमदार कामगिरी करून सुमारे ५ लाख ९० हजार ८७० रुपयांचा दारूसाठा [मुद्देमाल] जप्त करण्यात आल्याची माहिती दुय्यम निरीक्षक गिरीश कुमार कर्चे यांनी दिली.

      ​ तालुक्यातील अनेक गावात गावठी दारू,देशी दारू व परराज्यातील मद्याची विक्री जोमाने सुरू होती.अशा धंद्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग बारामती यांनी कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.

     ​याबाबत माहिती देतांना दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे यांनी सांगितले की, १ जुलै ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान ९ गुन्हे दाखल करून ११ आरोपींना अटक केली आहे. तसेच एक चारचाकी, एक दुचाकी वाहन, गावठी दारू १०० लिटर, देशी दारू ३३ लिटर, परराज्यातील मद्य १५६ लिटर, रसायन २०० लिटर असा ५ लाख ९० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​ ६६ तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन 

    सर्व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करायचे आहे.ज्या गावात चोरून दारू विक्री चालू असेल अशा नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

◼️​ गिरीशकुमार कर्चे

दु.निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग बारामती.