“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ”; एकनाथ शिंदेंनी कुंभमेळ्यासाठी साधला संत-महंतांशी संवाद
नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनाला उपस्थित राहून कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या संत-महंतांशी संवाद साधला. साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संतांच्या माध्यमातून खरी दिवाळी साजरी होत आहे. हे केवळ राजकीय किंवा सामाजिक संमेलन नसून आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचा संस्कार
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी राजकारण हे समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचा संस्कार दिला. राजसत्ता हातात असली तरी आध्यात्मिक व धर्मसत्ता मोठी आहे. कुंभाच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन केले जाईल; कुणावरही अन्याय होणार नाही. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकार मोबदला देईल. साधुग्रामच्या भूसंपादनासंदर्भातील तक्रारीही सोडवल्या जातील. त्र्यंबकेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासकीय भवनासाठी आवश्यक निधी दिला जाईल असे यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार असल्याची घोषणा यावेळी केली. यासोबतच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या १३ आखाड्यांतील संत-महंत आणि साधूंच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने केली जाईल असेही याप्रसंगी जाहीर केले.