“दादांनंतर आम्ही पोरके झालो ; तुम्ही पोरके होऊ नये म्हणून मी जबाबदारी घेतली” -- सुनेत्रा पवार
यापुढे मी कायम तुमच्यासोबत दादांसारखी उभी राहीन
बारामती : चोपडज गावातील शेतकरी,मत दार,सभासद आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासा तील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
“प्रत्यक्ष राजकारणा चा माझा दुरान्वयानेही संबंध नव्हता.मात्र दादांनंतर आम्ही पोरके झालो. तुम्ही पोरके होऊ नये, यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारली,” असे भावनिक उद्गार सुनेत्रा वहिनी यांनी यावेळी काढले.
“प्रत्येक गावात अनेक विकासकामे झाली आहेत.मात्र आज लोकांना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारा, व्यक्तिगत लक्ष देणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. दादांनी आपल्या घराकडे कदाचित कमी लक्ष दिले ; मात्र त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिले. एवढे करूनही ‘दादांनी काही केले नाही’ असे बोलले जाते, याचे दुःख वाटते,” असे त्या म्हणाल्या.
विकासकामांचे बाबत टीका करणाऱ्यां वर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “चार जणांनी रानात चार घरे बांधायची आणि तिथे लाईट आली नाही म्हणून दादांच्या नावाने बोंब मारायची, हे योग्य नाही. बारामतीत पाणी कोणामुळे आले, याचाही विचार झाला पाहिजे.”
“मागे काय झाले, त्याची मला माहिती नाही. मात्र आता इथून पुढे काय करायचे,याची जबाब दारी माझी आहे. इथून पुढे जे कांही लागेल, त्यासाठी मी तुमच्या सोबत उभी राहणार आहे.तुमच्या साठी कायम उभी राहीन,अगदी दादांसारखी,” असा विश्वास सुनेत्रा वहिनी यांनी चोपडज येथील ग्रामस्थांना दिला.
शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांनी यावेळी विविध स्थानिक प्रश्न सुनेत्रा वहिनींसमोर मांडले. त्यांच्या प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.